Menu Close

ताजमहाल पूर्वीचे शिवमंदिर असल्याने तेथे शिवचालिसा पठण करणे चुकीचे नाही ! – विनय कटियार

‘राष्ट्रवादी स्वाभिमान दला’च्या कार्यकर्त्यांकडून ताजमहालाच्या परिसरात शिवचालिसाचे पठण

आग्रा : ताजमहाल पूर्वीच्या राजांचे महाल आणि मंदिर होते. शहाजहान याने त्याला कब्रस्तान बनवले. औरंगाबादमध्ये मृत झालेल्या मुमताजला येथे आणून पुरण्यात आले. त्यामुळे या मंदिराबाहेर कोणी शिवचालीसा म्हणत असेल, तर त्यात चुकीचे काय ?, असा प्रश्‍न भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केला आहे. २३ ऑक्टोबरला ‘राष्ट्रवादी स्वाभिमान दला’च्या कार्यकर्त्यांनी ताजमहालबाहेर शिवचालिसाचे पठण केले. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. यावर भाजपचे खासदार विनय कटियार यांनी प्रतिक्रिया देतांना वरील प्रश्‍न विचारला.

कटियार म्हणाले, ‘‘ताजमहालमध्ये पूजा करणे चुकीचे नाही. कोणीही आत गेला नव्हता, तर ते बाहेरून पठण करत होते. ते तेजोमंदिर आहे. ही वस्तूस्थिती समजून व्यवहार करायला हवा. ताजमहाल हे मंदिर असल्याची अनेक प्रमाणे मिळाली आहेत. मुमताजच्या कबरीवर पाणी पडते; कारण तेथे शिवपिंडी होती. तामजहालमध्ये नाग, धतुरा आदी आकृत्या आहेत. त्यांचा कळस अष्टकोनी आहे. मशिदीमध्ये असे कधीही नसते. ताजमहाल पर्यटनाच्या दृष्टीने जगप्रसिद्ध आहे; मात्र तो सांस्कृतिक वारसा नाही. ते तसेच ठेवावे; कारण आता ते कब्रस्तान झाले आहे. तेथे आता मंदिर होऊ शकत नाही. त्यामुळे बाहेर फलकावर ‘हे पूर्वी हिंदु राजाचे मंदिर होते’, असे लिहावे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *