राष्ट्रपतींनी टिपू सुलतानला ‘हुतात्मा’ संबोधल्याचे प्रकरण
मुंबई : लक्षावधी हिंदूंची क्रूरपणे हत्या करणारा आणि सहस्रो स्त्रियांवर बलात्कार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान हा इंग्रजांशी लढणारा स्वातंत्र्य योद्धा अथवा हुतात्मा नव्हता, तर हिंदु राजांकडून ओरबाडून स्वतःकडे घेतलेले म्हैसूरचे राज्य सोडवण्यासाठी त्याने इंग्रजांशी युद्ध केले होते. तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला नाही. अशा स्थितीत टिपूला हुतात्मा म्हणणे कसे योग्य होईल ? तो हुतात्मा आणि स्वातंत्रसैनिक होता, तर बाबर, औरंगजेब, अफझलखान, गजनीचा महंमद यांच्यासारखे आक्रमक कोण होते ? कि ते सुद्धा स्वातंत्र्यसैनिक होते ? मुसलमान मतांच्या लाचारीसाठी खोटा अन् कपोलकल्पित इतिहास मांडून क्रूरकर्मा टिपूचे उदात्तीकरण करण्याचे जे कारस्थान कर्नाटकातील काँग्रेस सरकार करत आहे, त्याविषयी राष्ट्रपतींच्या केंद्रातील सल्लागार मंत्रीपरिषदेने सूचीत का केले नाही ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच ‘टिपू सुलतान इंग्रजांशी लढतांना हुतात्मा झाला होता’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून हिंदु जनजागृती समितीने हा प्रश्न उपस्थित केला.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की,
१. खरे तर राष्ट्रपतींचे वक्तव्य हे राष्ट्राचे मत असले पाहिजे. त्यासाठी अधिक दायित्वाने आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य करणे, हे राष्ट्रपतींचे दायित्व आहे. टिपूचा हिंदुद्वेष्टा आणि रक्तरंजित इतिहास कोविंद यांनी कधीही न वाचता त्याला हुतात्मा म्हणणे, हे सर्वथैव अनुचित आहे.
२. वस्तूतः टिपू सुलतानाने दक्षिणेतील सत्ता हाती येताच ‘सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करीन’, अशी प्रतिज्ञा भर सभेत केली. त्याने गावोगावच्या मुसलमानांना लेखी कळवले, ‘सार्या हिंदु स्त्री-पुरुषांना इस्लामची दीक्षा द्या. स्वेच्छेने धर्मांतर न करणार्या हिंदूंना बलात्काराने मुसलमान करा किंवा हिंदु पुरुषांना ठार मारा अन् त्यांच्या स्त्रियांना मुसलमानांमध्ये वाटून टाका.’ पुढे टिपूने मलबार भागातील एक लक्ष हिंदूंना बाटवले.
३. कर्नाटक स्वारीत टिपू सुलतानने एका दिवसाच्या आत ५० सहस्र हिंदू बाटवले. त्याने हिंदूंच्या धर्मांतरासाठी काही कडव्या मुसलमानांची विशेष टोळी उभारली. आक्रमक इस्लामी प्रचार केल्यामुळे त्याला ‘सुलतान’, ‘गाझी’, ‘इस्लामचा कर्मवीर’ इत्यादी उपाध्या देश-विदेशांतील मुसलमान आणि तुर्कस्थानचा खलिफा यांच्याकडून मिळाल्या होत्या. हा सारा क्रौर्यपूर्ण इतिहास राष्ट्रपती महोदयांनी वाचावा, अशी हिंदु समाजाची अपेक्षा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात