Menu Close

इराकमध्ये संशोधकांना सापडल्या श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या ६ सहस्र वर्षे जुन्या मूर्ती

  • हिंदु धर्म अतीप्राचीन असल्याचा आणखी एक पुरावा !
  • हिंदु धर्म आणि संस्कृती यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इराक : उर येथील प्राचीन अवशेषांमधून सर लिओनार्द वूले यांनी नवीन शोध लावले आहेत. त्यांचे हे नवीन शोध म्हणजे आधुनिक पुरातत्व शास्त्रातील मोठा विजयच आहे. उर येथे उत्खननाच्या वेळी त्यांना श्रीरामाचे मंदिर सापडले आहे. त्यामध्ये त्यांना भगवान श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या मूर्ती सापडल्या आहेत. या संशोधनामुळे संयुक्त प्राचीन भारत, इराण आणि सुमेर यांच्यामधील ऐतिहासिक संबंध उघड झाले आहेत. तसेच या संशोधनामुळे भारतीय संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र यांमधील दरी अल्प होणार आहे.

लार्सा येथे राम-सीन यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले हे मंदिर वाल्मीकि रामायणातील श्रीरामाचेच आहे. उर येथील राममंदिर हे भगवान श्रीरामाचे सर्वांत प्राचीन स्मारक आहे. प्राचीन काळी त्या क्षेत्रात वास्तव्य करणार्‍या दिलमून व्यापार्‍यांनी या मंदिराची उभारणी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमेरी ग्रंथांमध्ये मगन आणि मेलुखा यांच्यासह दिलमूनचाही उल्लेख आढळतो. त्यामुळे त्या काळी ही तिन्ही राज्ये एकमेकांशी जोडली होती, हे स्पष्ट होते.

भारतातील स्वत:ला उदारमतवादी संबोधणार्‍या प्रसारमाध्यमांच्या गटाने या मुद्यावर मौन धारण केले आहे. प्रसारमाध्यमांच्या या गटाला सौदी अरेबियाचे कट्टरवादी शेख गट आणि चीनमधील मार्क्सवादी गुंतवणुकदार यांच्याकडून पैसा मिळतो. शेख यांना भारताचे मध्य पूर्व देशांमध्ये रूपांतर करायचे आहे. तसेच चीनमधील मार्क्सवादी गुंतवणुकदारांना भारताची राष्ट्रीय अस्मिता नष्ट करून भारतावर सत्ता गाजवायची आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *