कथित असमानतेचा आरोप करून हिंदूंच्या विरोधात जगभर टाहो फोडणार्या प्रसारमाध्यमांना इंग्लंडमधील हा भेदभाव दिसत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लंडन : जगप्रसिद्ध ऑक्स्फर्ड आणि केंब्रीज यांसारख्या प्रसिद्ध विद्यापिठांमध्ये वर्णभेद केला जातो. या विद्यापिठांमध्ये काळ्या ब्रिटीश विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही, असा आरोप इंग्लंडमधील ‘लेबर पार्टी’चे खासदार अन् माजी शिक्षणमंत्री डेविड लॅमी यांनी केला आहे. या विद्यापिठांच्या महाविद्यालयांमध्ये सामाजिक भेदभाव केला जात आहे. वर्ष २०१५ मध्ये ऑक्स्फर्ड विद्यापिठातील ३ पैकी १ महाविद्यालयामध्ये एकाही काळ्या ब्रिटीश विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला नाही, असे विद्यापिठाने दिलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे. याच कालावधीत ६ केंब्रीज महाविद्यालयांमध्ये एकाही काळ्या ब्रिटीश विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हा सामाजिक भेदभाव आहे आणि आधुनिक ब्रिटनमध्ये हे घडणे उचित नाही, असे लॅमी यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात