ख्रिस्त्यांच्या या धर्मांतराच्या षड्यंत्रापासून वाचण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इंदूर (मध्यप्रदेश) : ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या उद्देशाने ८ अल्पवयीन मुलांसह एकूण १० जणांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली येथे रेल्वे पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये एक महिला असून तिचे नाव अनिता फ्रान्सिस आणि पुरुषाचे नाव अमृत कुमार असे आहे. हे दोघे १० जणांना अवंतिका एक्सप्रेसमधून मुंबई येथे धर्मांतराच्या उद्देशाने घेऊन जात होते. अटक करण्यात आलेल्या दोघांवर धर्मांतर आणि अपहरण करण्याच्या आरोपांखाली गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाचे अधिवक्ता कृष्णकुमार कुन्हारे आणि काशू महंत यांच्याकडून रेल्वे पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी रेल्वेत तपासणी केली असता ही घटना उघड झाली. अधिवक्ता कुन्हारे यांना मिळालेल्या माहितीनुसार या सर्व मुलांना मुंबईत नेण्यात येणार होते आणि त्यानंतर त्यांना १२ जानेवारीला केरळमध्ये नेण्यात येणार होते.
हिंदु जागरण मंचाचे श्री. संदीप कोठारी आणि राज बाडोलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडे हिंदु धर्माची काही पुस्तके जळलेल्या अन् फाटलेल्या अवस्थेत आढळून आली. तसेच काही मुलांची नावेही पालटण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या संशयितांनी मुलांच्या धर्मांतराचा आरोप फेटाळून लावला आहे. ‘ही मुले ख्रिस्ती असून त्यांच्या आई-वडिलांच्या संमतीनेच त्यांना नेण्यात येत होते’, असे या दोन्ही संशयितांनी सांगितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात