पुत्तूर (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
पुत्तूर (कर्नाटक) : हिंदु देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांना भारतामध्ये स्थान नाही, असे प्रतिपादन बजरंग दलाचे प्रांत गोरक्षा प्रमुख तथा मंगळुरू विभाग संचालक श्री. मुरलीकृष्णा हसंतडका यांनी केले. यापुढे प्रा. भगवान यांनी हिंदु देवताचा अनादर करणारी विधाने करणे बंद करावे, असेही त्यांनी सांगितले.
येथील बस स्थानकाजवळ झालेल्या राष्ट्र्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी हिंदु संघटनेचे प्रमुख श्री. अरुण कुमार पुत्तीला, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्र मोगेर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी श्री. अरुण कुमार पुत्तीला म्हणाले, ‘‘भारतात शांततेने रहाता यावे, यासाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये, तसेच त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी.’’ श्री. चंद्र मोगेर यांनी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अनादर करणारे प्रा. भगवान यांच्यावर तात्काळ कारवाई करावी’, अशी मागणी केली.
या वेळी आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी हातात भगवे झेंडे आणि विविध मागण्यांचे फलक धरले होते. त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रस्त्यावरून ये-जा करणार्या अनेक लोकांनी जिज्ञासेने आंदोलनाविषयीची माहिती जाणून घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात