पुणे : निगडी (पुणे) येथील पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसवर ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यक्रमाचा फलक लावण्यात आला आहे. यिशू छुडाता है – मुक्ती का महोत्सव, आपका दुख खुशी में बदल जाएगा असे आवाहन फलकातून करण्यात आले आहे. (अशा प्रकारे प्रलोभन देणार्या कार्यक्रमाला अंनिस सारख्या पुरो(अधो)गामी संघटना विरोध करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अशा प्रकारे विज्ञापन फलक लावण्यात आल्याविषयी डेपोचे आणि जाहिरात विभागाचे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे लक्षात आले.
पालिकेच्या बसवरील विज्ञापनांचे काम ठेकेदारांना देण्यात येते. ठेकेदारांकडून विज्ञापनांविषयी सर्व नियम पाळले जात आहेत का, यावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यपद्धतच नसल्याचे अधिकार्यांच्या बोलण्यातून समजले. (भोंगळ कारभार असलेले पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) बसवरील विज्ञापनांचे छायाचित्र व्हॉट्स अॅप वरून प्रसारित होत असून याविषयी हिंदुत्वनिष्ठांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
सायंकाळपर्यंत फलक काढून टाकू ! – सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पी.एम्.पी.एम्.एल्.
जाहिरात फलक अनधिकृतपणे लावण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. अशा प्रकारे जाहिरात लावणे चुकीचे आहे. तरीही या घटनेची चौकशी करेन. ती जाहिरात सायंकाळपर्यंत काढून टाकण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात