रोहिंग्यांंची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी निर्णय
छोटासा बांगलादेश राष्ट्रहितासाठी रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करतो, याउलट भारत सच्चर आयोगासारखे आयोग नेमून मतांसाठी मुसलमानांवर सोयी-सुविधांची उधळण करतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. बांगलादेश सरकारने रोहिंग्या मुसलमान रहात असलेल्या वस्त्यांमध्ये कंडोम (निरोध) वाटूनही उपयोग न झाल्यामुळे शेवटी सरकारने त्यांची नसबंदी करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात तेथील सैनिकांनी कारवाई चालू केल्यामुळे निर्वासित रोहिंग्या मुसलमानांचे लोंढे शेजारील राष्ट्रांमध्ये घुसखोरी करत आहेत. यातील सर्वाधिक रोहिंग्यांंनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे. बांगलादेशातील निर्वासित शिबिरांमध्ये आजमितीस ६ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान रहात आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या निर्वासितांना अन्न, पाणी यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे बांगलादेश सरकारला कठीण जात आहे. अशात त्यांची संख्या वाढत राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती सरकारला आहे. त्यामुळे रोहिंग्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सरकारने चालू केले आहेत.
अनेक रोहिंग्यांना १९ पेक्षाही अधिक मुले !
स्थानिक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या मुसलमानांमध्ये शिक्षणाचा अभाव असून कुटुंब नियोजनासारख्या गोष्टींपासून ते फार दूर आहेत. रोहिंग्यातील अनेक पुरुषांना एकापेक्षा अधिका बायका आहेत. काही रोहिंग्यांना तर १९ पेक्षाही अधिक मुले आहेत ! याची गंभीर दखल बांगदलादेश सरकारने घेतली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments