सनबर्न फेस्टिव्हल होऊ न देण्याविषयी महापौरांना निवेदन
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही. आम्हालाही हा कार्यक्रम नकोच आहे, असे सांगत महापौर श्री. नितीन काळजे यांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध दर्शवला आहे. (राज्य सरकारने संस्कृतीरक्षणाच्या दृष्टीने अनुकूल निर्णय घ्यावा, हीच जनतेची अपेक्षा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) युवा पिढीला अमली पदार्थ आणि नशा यांच्या गर्तेत ढकलणारा सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत होऊ देऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापौर नितीन काळजे यांना निवेदन देण्यात आले.
पाश्चात्त्य विकृतीला चालना देणारा सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड परिसरतील मोशी गावात होणार असल्याची चर्चा अद्यापही आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध असून याविषयीचे आंदोलन अजून तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.
महापौरांना निवेदन देतांना विश्व हिंदु परिषदेचे श्री. नितीन वटकर, बजरंग दलाचे श्री. अभिजीत शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे सवर्र्श्री जयहिंद सुतार, शैलेश येवले आणि अशोक कुलकर्णी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात