विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांकडून पुढील कारवाईसाठी त्वरित पाठपुरावा करण्याचे आश्वासन
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विज्ञानाच्या नावाखाली देव, धर्म आणि संतांविषयी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अपसमज निर्माण करून त्यांना नास्तिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाषणे आणि प्रश्नमंजुषा यांच्या माध्यमातून हिंदु धर्म आणि त्यांतील धार्मिक कृतींविषयी संभ्रम निर्माण केल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात मुंबई आणि बीड येथील शिक्षण विभागाकडून हे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवण्यात येऊ नयेत, असे लेखी आदेशपत्र काढण्यात आले आहेत. पुण्यातही असे प्रकल्प चालू असल्यास ते तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत, या आशयाचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी पुण्याचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार श्री. हेमंत निकम यांना दिले. या वेळी पिसोळी येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री मुकुंद मासाळ, धर्माभिमानी भागवत एप्रे, योग वेदांत सेवा समितीचे सुधाकर संगनवार, हिंदु जनजागृती समितीचे कृष्णाजी पाटील आणि विनायक बागवडे उपस्थित होते.