सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांसाठी घेण्यात येणारा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये, यांसाठी शाळांना पत्र पाठवू. अशा प्रकार कोणत्या शाळेत घडत असल्यास तुम्हीही आमच्या निदर्शनास आणून द्या, त्यावर योग्य ती कृती केली जाईल, असे मत जिल्हा परिषद येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. निशादेवी वाघमोडे यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी निवेदन देण्यात आले. त्या वेळी हे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी गोरक्षा समितीचे श्री. सचिन पवार, माळी समाजाचे विश्वस्त आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. श्रीकृष्ण माळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर उपस्थित होते.
हे निवेदन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, तसेच सांगली जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले. तासगाव येथे हे निवेदन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. प्रकाश कांबळे, तसेच तासगाव नगर परिषद येथे मुख्याधिकार्यांच्या नावे देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात