Menu Close

सोमालियामधील आत्मघातकी आक्रमणामध्ये २५ जण ठार, ३० घायाळ

मोगादिशू (सोमालिया) : सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये २५ जण ठार, तर ३० जण घायाळ झाले. येथे मंत्रीमंडळाची बैठक होणार होती. पोलिसांनी या वेळी एका मंत्र्यांसह ३० जणांना येथून सुरक्षित बाहेर काढले. या आक्रमणाचे दायित्व जिहादी आतंकवादी संघटना अल् शबाबने घेतली आहे. काही दिवसांपूर्वी या शहरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटामध्ये २७६ जण ठार, तर ३०० जण घायाळ झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *