धर्मांधांकडून हिंदूंवर झालेल्या आक्रमणांविषयी कोणी बोलल्यास लगेच त्यावरून वाद निर्माण होतो; मात्र जेव्हा गुन्हेगार अल्पसंख्यांकांवर कथित आक्रमणे होतात, तेव्हा ती असहिष्णुता ठरते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु संहतिचे संस्थापक अध्यक्ष श्री. तपन घोष यांनी नुकतेच ब्रिटनच्या संसदेमध्ये भाषण केले. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात श्री. तपन घोष यांनी तेथे दोन कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. याचे आयोजन ऑल पार्टी पार्लियामेंट ग्रुप फॉर ब्रिटीश हिंदूज या संस्थेचे अध्यक्ष खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी केले होते.
१. १८ ऑक्टोबरला नॅशनल काऊन्सिल ऑफ हिंदू टेम्पल्स (यूके) या संस्थेकडून आयोजित दिवाळी समारंभामध्ये टॉलरेटिंग द इनटोलरेट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाषण करतांना श्री. तपन घोष म्हणाले, मी माझ्या बंगाल राज्यात मुसलमानांच्या आक्रमणांपासून हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदु संरक्षण दलाची स्थापना केली आहे. तुमच्या देशात मुलींना मोठे झाल्यानंतर धोका असतो; मात्र आमच्या येथे आमच्या अस्तित्वाला, भूमीलाच धमकावले जाते.
२. याविषयी एका वृत्तसंस्थेजवळ स्पष्टीकरण देतांना श्री. घोष म्हणाले होते, मी इस्लामद्वेषी नाही. यापूर्वी श्री. घोष यांनी संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील मुसलमानांचा जन्मदर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते, असे म्हटले होते.
३. श्री. घोष यांच्या मुसलमानांच्या संदर्भातील विधानावरून ब्रिटनमधील लेबर (मजूर) पार्टीचे खासदार नाज शाह म्हणाले, तपन घोष यांचा दृष्टीकोन अत्यंत बीभत्स आहे. (धर्मांधांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे योग्य आहेत, असे शाह यांना म्हणायचे आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. गृहसचिव अंबर रूड आणि डी फॅक्टो, तसेच उपपंतप्रधान दमियां ग्रीन हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते; मात्र त्यांनी श्री. घोष यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. गृहसचिवांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की, श्री. घोष यांनी इस्लामविषयी मांडलेल्या विचारांशी गृहसचिव सहमत नाही. त्यांना येथे दिवाळीच्या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. ज्या वेळी श्री. घोष यांनी भाषण केले, तेव्हा गृहसचिव तेथे उपस्थित नव्हते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
५. खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी याविषयी म्हटले की, आतंकवाद आणि धर्मांधता यांच्याशी लढण्यास आम्ही कटीबद्ध असतांना ज्यांवर दबाव बनवण्यात आलेला आहे, त्या अल्पसंख्यांकाचेही विचार ऐकायला हवेत.
श्री. तपन घोष यांचे संसदेतील भाषण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात