शब्बीर खान यास पोलीस कोठडी
दंगलखोर धर्मांधांचे लांगूलचालन करण्याचे दुष्परिणाम ! आझाद मैदान दंगलीच्या प्रकरणी शब्बीर खानसह अन्य आरोपींना वेळीच कठोर शिक्षा झाली असती, तर ही घटना टळली नसती का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडील बेहरामपाडा झोपडपट्टीस नुकतीच भीषण आग लागली होती. ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचे प्रथम सांगण्यात येत होते; मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुंबईत वर्ष २०१२ मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीतील आरोपी शब्बीर खान (वय २९ वर्षे) याने ही आग लावल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी बजावली आहे.
या घटनेतील महत्त्वाची सूत्रे…
१. महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने २६ ऑक्टोबरला दुपारी वांद्रे स्थानकानजीकच्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई चालू केली होती.
२. त्या वेळी दुपारी ३.३० वाजता येथील झोपड्यांना आग लागून शेकडो झोपड्या जळल्या.
३. कारवाईच्या वेळी अधिकारी आणि कर्मचारी जेवायला गेले असता. शब्बीर आणि त्याच्या साथीदारांनी झोपड्यांच्या छतावर रॉकेल ओतले आणि एका झोपडीतील सिलेंडर उघडून ठेवला. त्यामुळे ही झोपडी पेटली आणि आग भडकली.
४. शब्बीर हा अवैध झोपड्या बनवून विकण्याचे काम करतो. ‘आगीत झोपड्या वैध असल्याची कागदपत्रे जळली’, असे त्याला भासवायचे होते.
५. शब्बीरवर अनेक गुन्हे प्रविष्ट आहेत, तसेच आग लावणारे ६ आरोपी असून त्यांच्यावर आझाद मैदानावर दंगल केल्याचा आरोप आहे. शब्बीरच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात