- संस्कृत श्लोक म्हणून राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार्या नेपाळमधील सौ. कांता माधव भट्टराय यांचे अभिनंदन ! भारतातील लोकप्रतिनिधी यातून काही बोध घेतील का ?
- भारतात सरकारी पातळीवर संस्कृत मृत भाषा ठरवली जाते, तर विदेशातील लोक तिचे महत्त्व जाणून तिचा वापर करतात ! ही आपली नतद्रष्टताच नव्हे का ? हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषेला तिचे पुनर्वैभव प्राप्त करून दिले जाईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
काठमांडू : येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’ या पक्षाच्या केंद्रीय सदस्या सौ. कांता माधव भट्टराय यांना नेपाळच्या महिला, बालबालिका आणि समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांनी संस्कृत श्लोक म्हणत या पदाची शपथ घेतली. त्या संस्कृत भाषेतील आचार्य आहेत. वर्ष २०१३ मध्ये त्या संसदेच्या सदस्य झाल्या होत्या.
सौ. कांता भट्टराय या संसदेतील त्यांच्या भाषणाचा आरंभ नेहमी संस्कृत श्लोकाने करतात. पूर्वी त्या प्राध्यापक होत्या. वर्ष २००८ मध्ये ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’ या पक्षाच्या केंद्रीय सदस्य बनल्या. तसेच त्या विश्व हिंदु महासंघाच्या नेपाळमधील संरक्षक आहेत. त्यांना आतापर्यंत ‘उमा महेश्वर’ पुरस्कार, ‘धर्मसभा’ पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सौ. कांता भट्टराय यांच्या पतीचा ‘पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभाग
सौ. कांता भट्टराय यांचे पती श्री. माधव भट्टराय हे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे वर्ष २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभागी झाले होते.सौ. भट्टराय यांनी राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या निमित्ताने ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) कु. सानू थापा यांनी त्यांचा सत्कार केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात