- धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ख्रिस्ती मिशनर्यांना गरीब हिंदूंचे प्रलोभन दाखवून धर्मांतर करणे सोपे जाते ! यामुळेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी धर्मांतराला वैध मार्गाने विरोध करण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
- जे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणारे सरकार आणि पोलीस यांच्या लक्षात का येत नाही ? मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने या सरकारकडून अशा गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायला हवे, अशीच हिंदूंना अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जबलपूर (मध्यप्रदेश) : येथील ख्राईस्ट चर्च शाळेच्या परिसरात प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे या सभेला विरोध करण्यात येणार आहे, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्मसेनेने दिली आहे. हिंदु धर्मसेनेकडून येथे निदर्शनेही करण्यात येणार आहेत.
हिंदु धर्मसेनेचे अध्यक्ष श्री. योगेश अग्रवाल यांनी सांगितले की, पोलीस आणि प्रशासन यांना आधीच सांगितले आहे की, ख्रिस्ती मिशनर्यांकडून त्यांच्या कार्यक्रमांना दूरवरच्या खेडेगावातील गरीब आदिवासींना प्रलोभन दाखवून आणले जाते. प्रार्थनासभेच्या नावाखाली मोठ्या संख्येने डॉ. पॉल दिनाकरन् यांच्याद्वारे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो.
हिंदु धर्मसेनेने मागणी केली की, या सभेला येणार्या लोकांचे ओळखपत्र पडताळले, तर अर्ध्याहून अधिक जण हिंदूंच निघतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात