चिंचवड (पुणे) येथे वाचक मेळावा
पुणे : दैनिक सनातन प्रभात हिंदूंना कृतीशील करण्याचे काम करते. कोणत्याही संप्रदायावर झालेला अन्याय असो किंवा हिंदु धर्मावर आलेले संकट असो, दैनिक सनातन प्रभात सर्वांच्या साहाय्याला उभे रहाते. मनुष्यजन्माचे सार्थक करण्याच्या दृष्टीने दैनिक सनातन प्रभात सर्वांना मार्गदर्शन करते. राष्ट्र आणि धर्म कार्यात वाचकांनीही तन, मन आणि धन यांनी झोकून द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या वाचक मेळाव्यात ते बोलत होते.
सनातन संस्थेच्या श्रीमती वंदना करचे यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व विशद केले. तसेच भोसरी येथे होणार्या सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहनही केले. कार्यक्रमाला ४० वाचक उपस्थित होते. या वेळी सावरकर साहित्याचे अभ्यासक श्री. अक्षय जोग यांनीही ‘सावरकरांचे हिंदुत्व’ या विषयावर विचार मांडले. मेळाव्याच्या शेवटी झालेल्या गटचर्चेत वाचकांनी राष्ट्र-धर्म कार्यात कृतीशील होणार असल्याचे सांगितले.
वाचकांचे अभिप्राय
श्री. प्रशांत कोळी : वर्ष २००७ पासून माझ्याकडे साप्तहिक सनातन प्रभात चालू आहे. सनातन प्रभात वाचल्याविना पुढील कामांना प्रारंभच होत नाही.
सौ. सुनिता देशपांडे : दैनिक घरी आल्यावर चैतन्यच आल्याचे जाणवते. दैनिक वाचनामुळे माझ्यातही पुष्कळ पालट झाल्याचे जाणवते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. वाचक श्री. प्रशांत कोळी यांचा ५ वर्षांचा मुलगा कार्यक्रम संपेपर्यंत शांतपणे बसून नामजप करत होता.
२. सभागृहात एक फुलपाखरूही येऊन बसले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात