श्री हनुमानाचा अवमान केल्याचे प्रकरण
केजरीलवाल यांचा हिंदुद्वेष ! केजरीवाल यांचे अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचे असे विडंबन करण्याचे धाडस झाले असते का ?
नवी देहली : देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी ट्विटरवर श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र शेअर केल्याच्या प्रकरणी हिंदु लीगल सेलने देहली पोलिसांकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (हिंदु देवतांचा अनादर करणार्यांवर कारवाईची तत्परतेने मागणी करणार्या हिंदु लीगल सेलचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. सेलचे सचिव अधिवक्ता प्रशांत पटेल यांनी या मागणीचे अधिकृत पत्र देहली पोलिसांकडे पाठवले आहे.
२. तेलंगण येथील धर्माभिमानी श्री. करूणा सागर करीमशेट्टी यांनीही तेलंगणच्या सायबराबाद पोलिसांकडे केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (धर्मरक्षणासाठी कार्य करणारे श्री. करूणा सागर करीमशेट्टी यांच्यासारखे धर्माभिमानीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. या व्यंगचित्रात मेक इन इंडियाच्या आग लागलेल्या व्यासपिठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्यासपिठाच्या भोवती महागाई, विधानसभा निवडणूक, कोसळता शेअर बाजार आदी विषय लिहिले आहेत. तेथे आकाशात उड्डाण केलेला शेपटीला आग लागलेला हनुमान पंतप्रधान मोदी यांना सांगत आहे, काम झाले आहे. आता सर्व लक्ष जवाहरलाल नेहरू विद्यापिठाकडे वळले आहे. तेव्हा चित्रात दाखवण्यात आलेली प्रसारमाध्यमे हनुमानाचे वाक्य ऐकून जवाहरलाल नेहरू विद्यापिठाकडे धावत आहेत, असे दाखवण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात