मालेगाव (जिल्हा नाशिक) येथे एक वक्ता सभांचे आयोजन
सायने मोठे, मालेगाव (जिल्हा नाशिक) : स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी लोकशाहीच्या नावावर जी व्यवस्था लादली, ती भारतातील परंपरा आणि नागरिक यांना विचारात न घेता लादण्यात आली. ही व्यवस्था खरोखरच चांगली असेल, तर अजूनही सामान्यांना अधिकारांसाठी आंदोलन का करावे लागते ? बहुसंख्यांकांना डावलून अल्पसंख्यांकांचा विचार करणारे नव्हे, तर समाजाचा सर्वांगीण विकास करणार्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखे हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी सायने मोठे, मालेगाव, नाशिक येथे आयोजित १ वक्ता सभेत केले.
येथील प.पू. भोलेनाथ बाबा यांच्या मंदिरात सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी १०० धर्माभिमानी उपस्थित होते. सभेनंतर धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी उपस्थित धर्माभिमान्यांनी केली.
१२५ धर्माभिमान्यांच्या उपस्थितीत पळसदारे येथे सभा झाली !
पळसदारे, मालेगाव (जिल्हा नाशिक) : धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु स्वत्व गमावत आहेत. हिंदु मुली आणि महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदूंचे प्रभावी संघटनही होत नाही. प्रत्येक गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी हिंदु तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी सायने मोठे, मालेगाव, नाशिक येथे आयोजित १ वक्ता सभेत केले. येथील मारुति मंदिरात सभा घेण्यात आली. या वेळी १२५ धर्माभिमानी उपस्थित होते. सभेनंतर जवळच्या भिलकोट गावात सभा घेण्याची मागणी उपस्थित धर्माभिमान्यांनी केली.
विशेष
दोन्ही सभांचे नियोजन चिखलओहोळ, मालेगाव येथील धर्मप्रेमी सर्वश्री संदीप वाघ, दत्तात्रय अहिरराव, गणेश खैरनार यांनी पुढाकार घेऊन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात