२ धर्मांधांकडून रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भातील विषयाचे ध्वनीमुद्रण
यवतमाळ : रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला, सिंहगड किल्ल्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत यांच्यावर टीका करणारे कर्नाटक येथील प्रा. के. एस्. भगवान यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी येथे २८ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात रोहिंग्याची बाजू घेणार्या संघटना, धार्मिक आणि राजकीय नेते यांचा निषेध करण्यात आला. ‘रोहिंग्यांच्या समर्थनार्थ कोणालाही आंदोलनाला अनुमती देण्यात येऊ नये’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी केली. या वेळी दोन धर्मांधांनी आंदोलनाच्या बाजूला उभे राहून रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भातील विषयाचे ध्वनीमुद्रण केले. (किती हिंदू धर्मबांधवांच्या संदर्भात असे सतर्क असतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
विशेष क्षणचित्रे
१. आंदोलनात २७५ हून अधिक स्वाक्षर्या देऊन विरोध दर्शवण्यात आला.
२. गोपनीय विभागातील अधिकार्यांनी काही वेळ आंदोलनाचे चित्रीकरण केले. (हाच वेळ आतंकवाद्यांच्या शोधार्थ दिला असता, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. ‘ई. टीव्ही मराठी’ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने आंदोलनाला भेट दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात