Menu Close

हरियाणामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप

गुरुग्राम (हरियाणा) : हथीन येथील एका गावामध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाहरूख नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याचा सहकारी अदिल याचा पोलीस शोध घेत आहेत. (अशा गुन्हेगारांना शरीयतनुसार शिक्षा करण्याची कोणी मागणी केल्यास आश्यर्च वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पोलिसांनी म्हटले की, पीडित मुलीला आमिष दाखवून नेण्यात आले होते. श्रीराम युवा संघटना, बजरंग दल आणि राष्ट्रीय आर्य क्षत्रिय सभा यांनी म्हटले आहे की, हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. शाहरूख याने ‘राज शर्मा’ नावाने खोटे फेसबूक खाते उघडले होते. त्याच्या खिशामध्ये एक कागद मिळाला असून त्यावर त्याचा भ्रमणभाष क्रमांक असून ‘राहुल’ असे नाव आहे. तसेच त्याच्याकडे लहान लहान चिठ्या आणि मनगटावर बांधायचे धागे अन् गळ्यात घालायचे देवतांचे पदकही सापडले. (हिंदु युवतींनो, धर्मांधांचे लव्ह जिहादचे षड्यंत्र जाणा आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी वेळीच धर्मशिक्षण अन् स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *