Menu Close

अमेरिकेत आतंकवाद्याने ‘अल्ला हू अकबर’ ओरडत ट्रकद्वारे लोकांना चिरडले, ८ ठार

जिहाद्यांचे अमेरिकेसमोरील आव्हान ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मॅनहॅटन भागात एका ट्रकचालकाने सायकलिंगसाठी बनवण्यात आलेल्या ट्रॅकवर बेदरकारपणे ट्रक चालवत ८ जणांना ठार केले. या आक्रणात ११ जण घायाळ झाले आहेत. सैफुल्लो हबीबुल्लाएव्हीक सायपोव्ह असे या आतंकवाद्याचे नाव असून तो उझबेकीस्तानचा रहिवासी आहे. तो ७ वर्षांपूर्वी अमेरिकेत आला होता. त्याने हा ट्रक भाड्याने घेतला होता, असे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आक्रमणापूर्वी आतंकवादी जोरजोराने ‘अल्ला हू अकबर’, असे ओरडला होता. लोकांना चिरडल्यानंतर सैफुल्लो पळून जाण्याच्या सिद्धतेत असतांना पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या पोटाला लागली होती. या प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमधील या आक्रमणाचा निषेध केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *