Menu Close

पिंपरी येथे सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा

‘सनातन प्रभात’विषयी वाचकांनी व्यक्त केली आपुलकीची भावना

गटचर्चेच्या माध्यमातून अनौपचारिक संवाद साधतांना वाचक

पिंपरी : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह कटिबद्ध आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची सांगड घालून वाचकांना धर्मरक्षणाची आणि साधनेची दिशा दिली जाते. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांशी संबंधित वाचक, विज्ञापनदाते, वितरक आणि साधक यांचे सनातन धर्माच्या धाग्याने बांधलेले एक कुटुंबच निर्माण झाले आहे. ही कुटुंबभावना अजून दृढ व्हावी, या उद्देशाने २९ ऑक्टोबर या दिवशी येथील दक्षिणमुखी मारुति मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेला ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा मेळावा उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपस्थित वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी आपुलकीची भावना व्यक्त केली.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये विषद केली, तर सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे यांनी साधनेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन सौ. वैष्णवी साळुंखे यांनी केले. या मेळाव्याला ३० वाचक उपस्थित होते. मंदिराचे विश्‍वस्त सदस्य श्री. कृष्णा वाघेरे यांचेही कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

‘सनातन प्रभात’विषयी दृढ विश्‍वास व्यक्त करणारे वाचकांचे मनोगत

१. श्री. सुधीर फडणवीस : ‘सनातन प्रभात’ हे परखडपणे विचार मांडणारे एकमेव दैनिक असून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध आहे. हिंदु राष्ट्र हे येणारच आहे. सत्य काय आहे हे केवळ ‘सनातन प्रभात’मुळेच समजते. मी देवद आश्रमाला भेट दिली तेव्हा तेथील व्यवस्थापन आणि नि:स्वार्थपणे कार्य करणारे साधक बघून मन थक्क झाले.

२. श्री. विशाल इडगे : मी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीकोनातून पडताळून पाहण्याची मला सवय आहे. यामुळे सनातन संस्थेची आणि बाजारातील इतर उत्पादने यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ मागवला. या उपकरणाची माहिती सनातन प्रभातमधूनच वाचली. अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, सनातन संस्थेच्या उत्पादनांमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा आहे. कोणतीही कृती करत असतांना नामजपाची जोड असली, तर आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढते.

३. श्री. सुधीर पकडे : हिंदु धर्माला अनुसरून आदर्श अशी कार्यपद्धत सनात संस्था अवलंबत आहे.

४. श्री. सुभाष इदगे : साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मुळे स्वतःमध्ये पालट झाल्याचे मी अनुभवले. मला पूर्वी पुष्कळ राग येत असे; पण आता हा रागीटपणा अल्प झाल्याचे जाणवते. आता काही प्रसंगांत शांत रहाता येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *