बीजिंग : ब्रह्मपुत्र नदीचा प्रवाह तिबेटमधून शिंजियांग येथे वळवण्यासाठी १ सहस्र कि.मी. अंतराचा बोगदा खणण्याचा विचार चीनचे अभियंते करत आहेत. हाँककाँकच्या ‘साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामुळे पर्यावरणनिष्ठांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे हिमालयातील क्षेत्रावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. चीन सरकारने मात्र ‘आमची अशी कुठलीही योजना नाही’, असे सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे. (विश्वासघातकी चीनवर भारताने कदापि विश्वास ठेवू नये ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) चीनचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्याच्या मोठ्या क्षेत्राला पाणी मिळणार आहे. चीनने यासाठी १०० हून अधिक वैज्ञानिकांचे पथक निर्माण केले आहे.
चीनने यापूर्वी मध्य युनान भागामध्ये ६०० कि.मी. अंतराचा बोगदा बनवण्यास चालू केले आहे. हा अभ्यासासाठी करण्यात येणारा प्रयत्न असणार आहे. चीनकडून यापूर्वी ब्रह्मपुत्रा नदीवर धरणे बांधण्यात आली आहेत. याचा भारताने विरोध केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात