Menu Close

ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूसच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार

चमत्काराचे दावे करून सहस्रो हिंदूंना फसवणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात अंनिस शेपूट का घालते ? तिला कोणत्या परदेशी ख्रिस्ती संस्थांकडून पैसे येतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सांगवी : तमिळनाडू येथील ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस हा हिंदूंना भुलवून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतो, असा आरोप आहे. आतापर्यंत त्यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली असून गोरगरिबांना फसवण्यासाठी अंधश्रद्धा पसरवणारे अनेक चमत्काराचे दावे केले आहेत. अशा लाझरूस याचा १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत येथील पी.डब्ल्यू.डी.च्या मैदानावर ‘मुक्ती महोत्सव’ या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम होऊ नये, तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी लाझरूस याच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. बजरंग दलाचे श्री. कुणाल साठे यांनी ही तक्रार केली असून मोहन लाझरूस यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्याची चेतावणी दिली आहे. (अंधश्रद्धा पसरवणारी विधाने करणार्‍या मोहन लाझरूस यांचा कार्यक्रम सांगवी येथे होत असतांना अंनिस गप्प रहाते, तसेच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार मोहन लाझरूस आणि त्याच्या सहकार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी अंनिस काहीच प्रयत्न करत नाही, हे लक्षात घ्या. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मोहन लाझरूस यांची हिंदुद्वेषी आणि दिशाभूल करणारी विधाने

१. लोकांना हिंदूंच्या देवता किंवा चंदनाचा टिळा वाचवणार नाही, तर येशूच वाचवेल.

२. येशूला प्रार्थना केल्यावर असाध्य रोग तत्काळ बरा होतो.

३. गीता, योग, तसेच सूर्यनमस्कार सैतान आहेत.

४. भारतावर येशूचे राज्य यावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *