Menu Close

शहापूर येथे वाहनाच्या अपघातामुळे अपहरण केलेल्या गायीची सुटका

३ धर्मांधांचे पलायन

गोवंशियांचे होणारे अपहरण शासन कधी रोखणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

शहापूर (जिल्हा ठाणे) : येथील शहापूर तालुक्यातील डोंगराळ भागातून जनावरे चोरणार्‍या टोळीने उच्छाद मांडला आहे. मध्यंतरी शहापूरजवळ एका वाहनाच्या अपघातानंतर धर्मांधांनी अपहरण केलेल्या एका गायीची सुटका झाली; मात्र वाहनातील ३ धर्मांधांनी तिघांनी तेथून पलायन केले. त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. धर्मांधांना पळून जाण्यासाठी तेथील पोलिसांनी साहाय्य केली, अशी तेथील नागरिकांमध्ये चर्चा होती.

यापूर्वीही २-३ वेळा गोठ्यातील गायी, बैल, वासरू चोरीला गेले आहे. रात्री जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांना टेम्पोतून भिवंडी, कुर्ला येथे कत्तलीसाठी नेण्यात येते. (गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *