नाळे, मालेगाव (जिल्हा नाशिक) : सध्या हिंदूंना कोणत्याही प्रकारचे धर्मशिक्षण मिळत नाही. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु मुली आणि महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदू आपली तेजस्वी शौर्य परंपरा विसरल्यामुळे त्यांची स्थिती बकर्यांच्या कळपात राहिलेल्या सिंहासारखी झाली आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी हिंदु युवक आणि युवती यांनी प्रत्येक गावात धर्मशिक्षणवर्ग, तसेच प्रशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी येथे आयोजित एक वक्ता सभेत केले.
या वेळी १२५ धर्माभिमानी उपस्थित होते. सभेनंतर धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी उपस्थित धर्माभिमान्यांनी केली.
सभेचे नियोजन चिखलओहोळ, मालेगाव येथील धर्मप्रेमी सर्वश्री संदीप वाघ, दत्तात्रय अहिरराव, गणेश खैरनार, तसेच नाळे येथील श्री. सचिन साळुंके यांनी पुढाकार घेऊन केले. सभेचे सूत्रसंचालन श्री. संदीप वाघ यांनी केले.
वैशिष्ट्यपूर्ण
गावाची लोकसंख्या ४०० आहे. तरीही सभेसाठी १२५ जण उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात