फरीदाबाद (हरियाणा) : येथील श्री सिद्ध पीठेश्वर हनुमान मंदिराच्या २८ ऑक्टोबरला झालेल्या वार्षिकोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला होता. या वेळी स्थानिक आमदार सीमा त्रिखा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहराच्या महापौर सुमन बाला याही उपस्थित होत्या. मान्यवरांना पुष्पहार घालून ‘सनातन पंचाग २०१८’ भेट देण्यात आले. या वेळी समितीकडून हनुमानाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनिमित्त हिंदु एकता फेरीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली आणि त्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले. नामजपाविषयी माहिती देण्यात आली.
या वेळी समितीकडून येथे ग्रंथ प्रदर्शन आणि राष्ट्र आणि धर्म यांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात