पंढरपूर : चार लाख भाविकांच्या उपस्थितीत काल (दि. १८) पंढरपूर येथे माघ एकादशीचा सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्निक माघ एकादशीची शासकीय नित्यपूजा केली.
काल भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दर्शनाची रांग मंदिरापासून ५ किलोमीटर अंतरावरील गोपाळपूर यात्रा शेडपर्यंत पोहोचली होती. प्रशासनाच्या अंदाजापेक्षा यावर्षी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दीडपट वाढ झाली. मात्र मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. माघी यात्रेनिमित्त पहिल्यांदाच विठ्ठल मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे .
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स