Menu Close

गोवंशियांच्या ८ टन मांसाची वाहतूक करणारा ट्रक आणि तीन धर्मांध कह्यात !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पडघा (जिल्हा ठाणे) : गोवंशियांचे अनुमाने ८ टन मांस घेऊन जाणारा ट्रक बजरंग दलाच्या श्री. यतींद्र जैन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पकडून दिला आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येथे घडली आहे. या प्रकरणी ट्रक चालक निसार अब्दुल शेख, जाकिर खान आणि नासीर खान यांना कह्यात घेण्यात आले आहे.

भिवंडीतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संगमनेर येथून गोवंशियांचे मांस घेऊन ट्रक निघाल्याची माहिती मिळाली होती. त्याविषयीची माहिती कार्यकर्त्यांनी पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पुकळे यांना दिली. घटनेचे गांभीर्य पाहता त्यांनी तात्काळ पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई नाशिक-महामार्गावरील अरजोली येथील पथकर नाक्यावर नाकाबंदी केली. काही वेळातच या मार्गावरून संशयास्पद आलेल्या ट्रकचालकाने पोलिसांना पाहताच ट्रक भरधाव पळवला. पोलिसांनी पाठलाग करून १ किलोमीटर अंतरावरील तलवली कल्याण नाका या ठिकाणी आयशर ट्रक कह्यात घेतला.

या प्रकरणी ट्रकचालकासह त्याच्या साथीदारांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ट्रक संगमनेर येथील कसाई लाला हाजी यांचा असून, तेथील मांस वाशी येथील मयुर कोल्ड स्टोरेज येथे घेऊन चालल्याची त्यांनी स्वीकृती (कबुली) दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र पशूसंवर्धन कायदा १९९५ कलम ५(क), ९(अ) नुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (गोतस्करांवर कारवाई करण्यासमवेत संबंधित व्यापार्‍यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *