ब्रिटीश संसदेत प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आणि ‘हिंदु संहति’चे संस्थापक अध्यक्ष श्री. तपन घोष यांचे ठाम प्रतिपादन
बंगालमधील ‘हिंदु संहति’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. तपन घोष यांनी नुकतेच ब्रिटनच्या संसदेमध्ये भाषण केले. तसेच ‘नॅशनल काऊंसील ऑफ हिंदु टेंपल्स’ या हिंदु संघटनेने आयोजित कार्यक्रमामध्येही त्यांनी ‘असहिष्णुतांच्या प्रती सहिष्णुता’ या विषयावर विचार मांडले. यातील काही सूत्रे वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. गांधार म्हणजे सध्याचे कंदहार ! दुर्योधनाची माता गांधारी ही गांधार राज्याची राजकन्या. गांधार, सिंध, पंजाब, बंगाल ही आपली भूमी होती.
२. सध्या भारत देशालाच धोका निर्माण झाला असून हिंदु धर्म संकटात आहे. आपली संस्कृती संकटात आहे. वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. आम्हाला सांगण्यात आले की, फाळणीनंतर तुमच्यातील भांडणे कायमची दूर होतील. त्यामुळे मोठा रक्तपात आणि कत्तल होऊनही आम्ही देशाची फाळणी स्वीकारली. कोट्यवधी हिंदू निर्वासित झाले. आम्ही आमची भूमी दिली; मात्र त्यातून समस्या सुटली नाही.
३. वर्ष १९९० मध्ये आमच्याच काश्मीरमधून हिंदूंना बलपूर्वक हुसकावून लावण्यात आले. फाळणीच्या वेळी बंगालमध्ये ८१ टक्के हिंदु आणि १९ टक्के मुसलमान होते. सध्या ७० टक्के हिंदु, तर ३० टक्के मुसलमान अशी स्थिती आहे. देशात मुसलमानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय हव्यासापोटी हे सहन करायचे का ? ही असहिष्णुता का सहन करायची ?
४. भारतात अल्-कायदा, लश्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांना थारा दिला जात नाही. तरीही भारताच्या ग्रामीण भागात रहाणार्या सर्वसामान्य हिंदूंना सध्या भयभीत वातावरणात जीवन जगावे लागत आहे. ‘लव्ह जिहाद्यां’कडून हिंदूंच्या मुलींना आणि बहिणींना पळवून नेले जात आहे.
५. मी जेव्हा ब्रिटनमध्ये येतो, तेव्हा माझ्यावर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप होतो; मात्र जेव्हा आमचे अस्तित्वच धोक्यात येते, तेव्हा मानवाधिकाराच्या नावाखाली सगळे सहन करायचे का ? आपल्याच देशात हिंदु सुरक्षित नाही. त्यामुळे काही कठोर पावले उचलावी लागतात.
६. मानवाधिकाराचे उल्लंघन यांसारख्या गोष्टी तुम्ही तुमच्या देशात अवश्य करा; मात्र आम्हाला ते करण्यास भाग पाडू नका. आमचा वैभवशाली वारसा, आमची संस्कृती, आमचा धर्म सध्या संकटात आहे. आम्हाला त्यांचे रक्षण करायचे आहे. माझ्या बंगालमध्ये काश्मीरसारखी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
७. अनेक मदरशांमधून मानवी बॉम्ब निर्माण केले जातात. ४-५ वर्षांच्या मुला-मुलींच्या कोवळ्या मनावर जिहाद, काफिर, यांसारख्या गोष्टी बिंबवल्या जातात. संपूर्ण जगासाठी हे धोकादायक आहे. युरोपातील लोकांनी त्यांच्या सरकारांच्या माध्यमातून मदरशांना पैसा पुरवणार्या मध्य-पूर्व देशांवर दबाव आणला पाहिजे.
८. समाजाचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे काम आहे. हे क्षत्रीय आता पुढे सरसावणार आहेत. आम्ही त्यांचा मान राखला पाहिजे. आम्ही त्यांचा आदर केला पाहिजे. देशावर आलेले संकट परतवून लावण्यासाठी हिंदू सक्षम आहेत.
९. माझी ‘हिंदु संहति’ ही संघटना हिंदूऐक्यासाठी कार्यरत आहे. सामाजिक कार्य करणारी व्यक्ती किंवा संघटना कुठल्याही राजकीय पक्षांशी संलग्न असता कामा नये. सर्व हिंदूंना एका व्यासपिठावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपले राष्ट्र, भूमी, मंदिरे, देवता, संस्कृती यांच्या रक्षणासाठी ‘हिंदु संरक्षण दला’ची निर्मिती करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात