भारतीय शासनकर्ते चीनचा धूर्तपणा आतातरी जाणतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संयुक्त राष्ट्र : पाकमधील जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि पठाणकोट येथील भारतीय वायूसेनेच्या तळावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाला चीनने पुन्हा विरोध केला. यापूर्वीही त्याने याला विरोध केला होता. चीनने म्हटले की, यावर सर्वसंमती होऊ न शकल्याने ते आम्ही फेटाळले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अल् कायदा प्रतिबंधक समितीकडून त्याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीनच्या या निर्णयावर भारताने प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, केवळ एका आतंकवाद्यासाठी एकच देश आंतरराष्ट्रीय सहमतीचा विरोध करत आहे, हे पाहून निराशा वाटली. त्याची दुटप्पी भूमिका आतंकवादाच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय लढाईला शक्तीहीन करण्याचा प्रयत्न आहे.
(म्हणे) भारताशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची इच्छा ! – चीन
मसूद अझहरला जिहादी आतंकवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत खोडा घातल्यानंतर दुसर्याच दिवशी चीनने मखलाशी करत भारताशी द्विपक्षीय संबंध सुदृढ करण्याची इच्छा आहे, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात