कार्यकारी अभियंत्यांनी कार्यक्रम रहित करण्याविषयी आयोजकांना पत्र दिले
सांगवी (पिंपरी-चिंचवड) : सांगवी येथे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून आयोजित करण्यात आलेला मुक्ती महोत्सव बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या तीव्र विरोधामुळे रहित होण्याच्या मार्गावर आहे. (लोकांना हिंदूंच्या देवता किंवा चंदनाचा टिळा वाचवणार नाही, तर येशूच वाचवेल. गीता, योग, तसेच सूर्यनमस्कार सैतान आहेत, अशी हिंदुद्वेषी विधाने करणार्या ख्रिस्ती मिशनरी लाझरूस यांच्या कार्यक्रमाला संघटितपणे विरोध करून तो रहित होण्यासाठी प्रयत्न करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! अशा प्रकारे सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. या कार्यक्रमात हिंदुद्वेषी विधाने करणारे आणि धर्मांतराचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस येणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
२. त्यानंतर ज्या मैदानावर हा कार्यक्रम घेतला जाणार होता, त्या पी.डब्ल्यू.डी. मैदानाच्या कार्यकारी अभियंत्यांना हिंदुत्वनिष्ठांनी आयोजकांकडे पोलीस अनुमती नसल्याविषयी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाविषयी जाणीव करून दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी आयोजकांना कार्यक्रम रहित करण्यात यावा, असे पत्र दिले. (पोलिसांची अनुमती नसतांना अधिकार्यांनी डोळे झाकून कार्यक्रमासाठी अनुमती कशी काय दिली ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
कार्यक्रम रहित होणे, हा हिंदुत्वनिष्ठांचा विजय ! – कुणाल साठे, बजरंग दल
स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्यात मोठ्या संख्येने असलेले धर्माभिमानी युवक यांमुळेच कार्यकारी अभियंत्यांनी कार्यक्रम रहित करावा, असे पत्र दिले. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना या कार्यक्रमाच्या विरोधात संघटितपणे उभ्या राहिल्या. कार्यक्रम रहित होणे, हा हिंदुत्वनिष्ठांचा विजय आहे. पोलीसही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून कार्यक्रमाला अनुमती देणार नाहीत, असे आमचे ठाम मत आहे.
भगवंताच्या कृपेनेच हे सर्व शक्य झाले ! नितीन व्हटकर, विश्व हिंदु परिषद
सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन कार्यक्रमाला विरोध केला. भगवंताचे अधिष्ठान आणि कृपा असल्यानेच हे शक्य झाले. कार्यक्रम होऊ नये यासाठी आम्ही पाठपुरावा घेत आहोत.
(म्हणे) कार्यक्रमाला पोलिसांची अनुमती मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ! – जयकुमार पॉल, पदाधिकारी, युनाइटेड ख्रिश्चन फेलोशिप, पुणे
मैदानासाठी आम्हाला यापूर्वीच अनुमती मिळाली असून अभियंत्यांनी आम्हाला कार्यक्रम रहित करण्याविषयी केवळ विनंतीच केली आहे. पोलिसांची अनुमती मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. (पोलिसांची अनुमती नसतांनाही कार्यक्रमाचे विज्ञापन फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते आणि प्रसारही करण्यात आला. अशी अवैधपणे कृती करणार्या संबंधित आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी हिंदुत्वनिष्ठांची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हा धर्मांतराचा कार्यक्रम असल्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा अपसमज आहे. तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. (धर्मांतराचा आरोप असलेल्या मोहन लाझरूस या मिशनर्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलावण्यात आले होते. यावरून हा कार्यक्रम धर्मांतरासाठीच होता, हे सिद्ध होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात