- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यकारभार करणार्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष, हे लज्जास्पद !
- ऐतिहासिक वास्तूंचे जतन होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे राज्यकारभार करणारे राज्यकर्ते हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी गडाचा बुरूज ढासळला असून त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
१. गडावर इतिहासाविषयी माहिती असलेला फलक लावलेला नाही. त्यामुळे गडावर येणार्या पर्यटकांना गडाचे महत्त्व कळत नाही. गडाविषयी माहिती, गडाचा इतिहास कळत नाही.
२. गडावर पाणी शुद्ध करण्यासाठी यंत्र (फिल्टर) बसवले आहेत; मात्र त्यात कित्येक मासांपासून पाणी नाही. पाणी पिण्यासाठी यंत्राला बांधण्यात आलेल्या ग्लासच्या साखळ्यांना गंज आली आहे.
३. गडावर विद्युत योजनेची व्यवस्था नाही. गडावरील अनेक विद्युत खांब नादुरुस्त झाले आहेत. काही ठिकाणी होल्डर आहेत; मात्र दिवे नाहीत, अशी दु:स्थिती आहे.
४. गडावर गडाच्या नकाशाचा फलक आहे; मात्र तोे संपूर्ण पुसट झाला आहे. कित्येक मास तो पालटण्यात आलेला नाही.
५. गडावर दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेली यंत्रे गडावर तशीच पडून गंज येऊन सडत आहेत; मात्र त्याकडे कुणाचे लक्ष नाही. (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यामुळे आज आपण जिवंत आहोत. राज्यकारभार करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेणार्या शासनकर्त्यांनी छत्रपतींच्या शौर्याची प्रतिके असलेल्या गडकोटांचेे संवर्धन आणि जतन करून युवापिढीसमोर त्यांचा आदर्श ठेवणे अपेक्षित आहे. हिंदु राष्ट्रात गडकोटांचे संवर्धन करून भारताचा तेजस्वी इतिहास युवकांना शिकवला जाईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात