Menu Close

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचे कार्यक्रम जळगाव येथे घेऊ नयेत !

हिंदुत्वनिष्ठांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जळगाव : हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानची जयंती गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील समाजविघातक शक्तींकडून हेतूपुरस्सर साजरी केली जाते. क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणासाठी कार्यक्रम घेऊन संवेदनशील असणार्‍या जळगाव जिल्ह्याचे वातावरण बिघडवण्याचे हे षड्यंत्र आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना वेळीच बंदी घातल्यास कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील, असे आशयाचे निवेदन येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

जळगाव जिल्हा आणि टिपू सुलतान यांचा संबंध नसतांना येथील सौहार्दपूर्ण वातावरणात अशा कार्यक्रमांमुळे गालबोट लागू शकते, याचे प्रशासनाने भान ठेवावे आणि असे कार्यक्रम आयोजित करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

उपस्थित कार्यकर्ते

शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, बजरंग दल नगर संयोजक श्री. राजू नन्नावरे, बजरंग दल गोरक्षा प्रमुख श्री. आकाश पाटील, बजरंग दल शहर प्रखंड श्री. स्वामी पोतदार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विशाल जगदाळे, स्वराज्य निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश सपकाळे, जय भवानी ग्रुपचे यशाजी चव्हाण, जय श्रीराम ग्रुपचे सर्वश्री भगवान सोनवणे, नीलेश सपकाळे, शुभम तायडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *