कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या माध्यमातून व्यापक जागृती
बेंगळुरू : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यातील बेंगळुरू, विजयनगर, कार्रकळ, भटकळ आणि कुमठा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
विजयपूर : येथे १ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. यात विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष बी. म्हणाले की, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून अनेक हिंदु महिलांवर अत्याचार करणार्या टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे हिंदूंशी केलेला द्रोह आहे. कन्नडविरोधी असलेल्या टीपूने कन्नड भाषेला धुडकावून पर्शियन भाषेला शासकीय भाषा करून कन्नडचा अवमान केला होता. त्याने अनुमाने ८ सहस्रांहून अधिक मंदिरांना तोडून तेथे मशिदी बांधल्या. ते पुढे म्हणाले की, जेवर्गीच्या आंदोल गावामधील श्रीराम सेनेचे राज्य गौरवाध्यक्ष श्री. सिद्दलींग स्वामी यांना केलेली अटक काँग्रेस सरकारचा पराकोटीचा हिंदूद्वेष स्पष्ट करते.
श्रीराम सेनेचे श्री. नीलकंठ कंदगल्ल म्हणाले की, टिपू सुलतान स्वातंत्र्यासाठी लढणारा नव्हता, तर तो हिंदुद्वेषी आणि कन्नडविरोधी होता. सरकारचा अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा निर्णय अयोग्य आहे.
आंदोलनाला श्री छत्रपती शिवाजी फाऊंडेशनचे श्री. किरण काळे, श्रीराम सेनेचे श्री. आनंद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बसवराज पाटील, श्री. मल्लीकार्जुन बमरेड्डी, विश्व हिंदु परिषदेचे श्री. समीर चिप्पलकट्टी, श्री. संतोष विश्वकर्मा, श्री. संतोष बेनुर, श्रीनिवास भंडारी, श्री. बसवराज हिरेमठ, धर्मसेनेचे श्री. शिवु कंबार आणि श्री. संतोष अंबिगेर हे उपस्थित होते.
बेंगळुरू : २ नोव्हेंबर या दिवशी बेंगळुरू शहरातील विजयनगर भागात असेच आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, श्री. नवीन गौडा, श्रीराम सेनेचे श्री. सुभाष, विजय विवेक प्रतिष्ठानच्या श्रीमती शकीला शेट्टी, रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा यांसह अनेक राष्ट्र आणि धर्म प्रेमी उपस्थित होते. श्री. मोहन गौडा यांनी या वेळी टिपू सुलतान याने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची विस्तृत माहिती दिली.
कार्रकळ : येथील बस स्टॅण्डजवळ १ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उडुपी येथील समन्वयक श्री. विजयकुमार, श्री. रमेश पेलाथूर, श्रीराम सेनेचे येथील संचालक श्री. अविनाश, अजित कुमार आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर येथील तहसीलदारांना राज्यपालांना देण्यासाठीचे निवेदन देण्यात आले.
भटकळ : २ नोव्हेंबर या दिवशी येथे झालेल्या आंदोलनानंतर साहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कन्नड संघाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग नाईक, श्री. श्रीकांत नाईक, व्यंकटेश मोगर, भाजपचे श्री. सुरेश नाईक, विश्व हिंदु परिषदेचे श्री. सुधाकर महाले, श्रीराम सेनेचे श्री. जयंत नाईक आणि अन्य धर्माभिमानी यावेळी उपस्थित होते.
कुमठा : येथे २ नोव्हेंबरला झालेल्या आंदोलनामध्ये विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. महेश नाईक, हिंदु जागरण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर नाईक, भाजपचे तालुकाध्यक्ष सर्वश्री हेमंत गावकर, अरुण नायक, रघु शेट, नरेंद्र आचारी, प्रशांत शेट्टी आदी धर्माभिमानी उपस्थित होते. या आंदोलनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीच्या उत्तर कन्नड जिल्ह्याच्या फेसबूक पानावर करण्यात आले होते. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात