काँग्रेस सरकारकडून टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचे प्रकरण
बेंगळुरू : क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटकमधील टिपूप्रेमी काँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी व्यापक जनआंदोलन आरंभले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून यास हिंदुत्वनिष्ठ संघटना, प्रसारमाध्यमे आदींकडून उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत आहे.
आतापर्यंत येथे झाली आंदोलने !
या विरोधात आतापर्यंत बेंगळुरू, मंगळुरू, पुत्तुरू, उडुपी, भटकळ, कुमठा, कार्रकळ येथे आंदोलन करण्यात आले आहे. याशिवाय बेळगांव तसेच दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बन्तावाला, बेल्थान्गाडी आणि सुळ्या या तालुक्यांतील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात