हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
बेळगाव : हिंदूंच्या हत्या आणि धर्मांतरे घडवणार्या क्रूर टिपू सुलतानची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने रहित करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने शिरस्तेदार श्री. जानकी यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, श्री. सुंदीप भिंडे, धर्मप्रेमी सर्वश्री भैरू बेलगुंडकर, विजय भोसले, सोमनाथ सप्रे, विक्रम लाड, डॉ. राजकुंवर देसाई, सनातन प्रभातचे वाचक श्री. कडोलकर, श्री. प्रदीप अलकुंटे, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री विनायक कारेकर, संतोष मलय, गणेश डेवर, संजय बोंगाळे, कर्तव्य महिला मंडळाच्या अक्काताई सुतार, मिलन पवार यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होतेे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात