देवतांचा अवमान रोखण्यासाठी आवाज उठवणार्या ‘वीर सेने’चे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा !
मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – वीर सेनेने दिलेल्या चेतावणीनंतर अंधेरी (पूर्व) येथील डान्सबार आणि रेस्टॉरन्टला असलेले ‘रामभवन’ हे नाव हॉटेल मालकाने पालटले आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी निवेदन देऊन एका आठवड्याच्या आत डान्सबारला असलेले प्रभु श्रीरामाचे नाव पालटण्याचे आवाहन वीर सेनेच्या वतीने करण्यात आले होते. यावर हॉटेलच्या मालकांनी नाव पालटण्यासाठी १ मासाचा कालावधी मागितला होता. त्यानुसार या डान्सबारचे नाव पालटून ‘द झॉक’ असे ठेवण्यात आले आहे.
३० ऑक्टोबर या दिवशी वीर सेनेच्या वतीने भांडुप येथील ‘हनुमान बार अॅण्ड रेस्टॉरन्ट’, तर ४ नोव्हेंबरला अंधेरी (पूर्व) येथील ‘श्री साईप्रसाद बार आणि रेस्टॉरन्ट’ यांना निवेदन देऊन एका आठवड्याच्या आत नावे पालटण्याची चेतावणी देण्यात आली आहे. भांडुप येथील ‘हनुमान बार अॅण्ड रेस्टॉरन्ट’चे नाव पालटण्याविषयी ६ नोव्हेंबर या दिवशी भांडुप पोलीस ठाण्यात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पोलिसांनी बारचे मालक आणि वीर सेनेचे पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे.
देवतांचे नाव असलेले बार आणि रेस्टॉरन्ट वीर सेना चालू देणार नाही ! – निरंजन पाल, अध्यक्ष, वीरसेना
हॉटेल, रेस्टॉरन्ट, डान्सबार यांसह ज्या गैरठिकाणी देवतांची नावे देण्यात आली असतील, त्यांना वीर सेना तीव्र विरोध करील. याविरोधात आम्ही लवकरच उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहोत. देवतांचे नाव असलेले बार आणि रेस्टॉरन्ट वीर सेना चालू देणार नाही.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात