-
मंगळुरू, पुत्तुरू आणि उडुपी येथे आंदोलन
-
दक्षिण कन्नड जिल्ह्यात ३ ठिकाणी प्रशासनाला निवेदन
बेंगळुरू – लाखो हिंदूंना ठार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून एल्गार केला आहे. क्रूरकर्मा, बलात्कारी टिपूची जयंती साजरी करू नये, या मागणीसाठी कर्नाटक राज्यातील बेंगळुरू, कार्रकाळ, भटकळ आणि कुमठा या ठिकाणी विविध हिंदुत्वनिष्ठांचे एकत्रित राष्ट्रीय हिंदू आंदोलन नुकतेच करण्यात आले. त्यानंतर मंगळुरू, पुत्तुरू आणि उडुपी येथे आंदोलन करण्यात आले, तर दक्षिण कन्नड येथे प्रशासनाला निवेदन देऊन टिपूच्या जयंतीचा हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी करण्यात आली.
१. मंगळुरू
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय कुमार म्हणाले, अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी हिंदूंची असंख्य मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणार्या देशद्रोही टिपू सुलतानची जयंती साजरी करू नये, अशी मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करत आहोत. या वेळी हिंदु महासभेचे श्री. धर्मेंद्र यांनी सांगितले म्हणाले, टिपू सुलतान हा हिंदुविरोधी, तसेच कन्नड भाषाविरोधी होता. यावरून त्याची जयंती साजरी करणार्या कर्नाटक सरकारची कन्नडविरोधी भूमिका स्पष्ट होते. हिंदु युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विरप्पा मुदुर्शदडे यांनी सांगितले की, मुसलमान पंथात कोणत्याही व्यक्तीचा जन्मदिवस साजरा करण्यावर निर्बंध आहेत; मात्र तरी कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मतांसाठी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा घाट घातला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय हिंदूंच्या विरोधातील आहे.
२. पुत्तूरू
हिंदुत्वनिष्ठांनी येथील राज्य परिवहन बस स्थानकाजवळ आंदोलन करून टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास विरोध दर्शवला. हिंदु जनजागृती समितीचे जनार्दन गौडा यांनी कर्नाटक सरकारने लाखो हिंदूंचे धर्मांतर करणार्या हिंदुद्रोही टिपू सुलतानची जयंती साजरी करणे खेदजनक आहे, असे सांगितले. येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते श्री. अरुण कुमार पुत्तीला आणि श्री. श्रीकृष्ण उपाध्याय यांनी भ्रष्ट, तसेच कन्नडविरोधी कर्नाटक राज्य सरकार निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेतून पायउतार होण्यासाठी, तसेच आदर्श राज्यकर्ता प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे या वेळी सांगितले.
३. उडुपी
काँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचे येथील भाजपच्या कार्यालयाजवळ आंदोलन झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उडुपी जिल्हा समन्वयक श्री. विजय कुमार, श्रीराम सेनेचे जिल्हा समन्वयक श्री. जयराम अंबिकल्लू अन् त्यांचे कार्यकर्ते, तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. विजय कुमार म्हणाले, केवळ मुसलमानांचे लांगूलचालन करणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, यांसाठीच क्रूरकर्मा कर्नाटक सरकार टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहे. बलात्कारी, अत्याचारी टिपू सुलतानची जयंती साजरी करून सरकार पुढच्या पिढीला कोणता संदेश देऊ पहात आहे ? श्री. जयराम अंबिकल्लू यांनी, कर्नाटक सरकराकडे दसरा सण साजरा करायला पैसे नसतात. मग क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यासाठी लाखो रुपये कुठून येतात ?, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
४. दक्षिण कन्नड
क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करू नये, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बन्तावाला, बेल्थान्गाडी आणि सुळ्या या तालुक्यांतील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात