बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांच्या समस्यांवर चर्चा
वॉशिंग्टन : बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे संस्थापक अधिवक्ता रविंद्र घोष यांनी वॉशिंग्टन येथे अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकाराच्या सूत्रावर त्यांच्याशी चर्चा केली. हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते. इंडियन अमेरिकन फ्रेंडशिप काऊन्सिलने या परिषदेचे आयोजन केले होते. राष्ट्रीय सेवा पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या सन्मानार्थ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधिवक्ता घोष यांनी अमेरिकेतील खासदार तुलसी गब्बर्ड, जॉर्ज होल्डींग आणि निक्की हेले यांची भेट घेऊन बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या मानवाधिकाराच्या सूत्रावर त्यांच्याशी चर्चा केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात