१६ वर्षांनंतर नवाज शरीफ यांची स्वीकृती !
इस्लामाबाद : भारत-पाकिस्तान एकच आहे, फक्त मध्ये एक सीमा आहे. आपण एकाच भूमीवरील सदस्य आहोत. वाजपेयी साहेबांनीसुद्धा हे मान्य केले आहे. कारगील युद्ध करून पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. वाजपेयी साहेबांच्या जागेवर मी असतो, तरीसुद्धा हेच बोललो असतो.
खंजीर कोणी खुपसला हे सर्वांनाच माहीत आहे; परंतु नाव कोणाचे घेऊ, अशी स्वीकृती पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. (माजी सैन्यदल प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनीच कारगिल युद्ध घडवले, हे जगजाहीर आहे; मात्र शरीफ त्यांचे नावही घेण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. यावरून ते भारताच्या विरोधात होणारे प्रत्येक आक्रमण रोखू शकत नाहीत, हे लक्षात येते. अशा नवाज शरीफ यांच्याशी केंद्रशासन मैत्रीचे संबंध निर्माण करत आहेत. वाजपेयी यांनीही हाच प्रयत्न केला आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आताच्या शासनाच्या संदर्भातही तेच होत आहे, हे पठाणकोटच्या आक्रमणातून दिसून आले. तरीही मैत्री करण्याचा मूर्खपणा केला जात आहे, याचेच जनतेला आश्चर्य वाटत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात