Menu Close

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव येथील धर्मजागृती सभेचे निमंत्रण

सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांना धर्मजागृती सभेचे निमंत्रण देतांना समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे

जळगाव : सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांना अजिंठा शासकीय विश्रामगृहात जळगाव येथे १९ नोव्हेंबरला होणार्‍या विशाल हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि सनातन संस्थेचे जिल्हासेवक श्री. दत्तात्रेय वाघुळदे यांनी दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गुलाबराव वाघ यांना धर्मजागृती सभेचे निमंत्रण देतांना समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे

या वेळी श्री. पाटील म्हणाले की, आमचा कायम धर्मजागृती सभेला पाठिंबा असतोच. आपले कार्य उत्तम असून आजच्या समाजाला आता याची खरी आवश्यकता आहे. अजून काही आवश्यकता असेल, तर मी नक्कीच साहाय्य करेन. तसेच शिवसेनेचे एरंडोल लोकसभेचे जिल्हाप्रमुख श्री. गुलाबराव वाघ, रावेर लोकसभेचे जिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांत पाटील यांनीही धर्मजागृती सभेला साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले असून जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना निमंत्रण देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *