Menu Close

कोशांबी (उत्तरप्रदेश) या मुसलमानबहुल गावात रहाणार्‍या हिंदु तरुणीवर इस्लाम न स्वीकारल्याने बलात्कार

पोलिसांकडून बलात्काराची तक्रार नोंदवून घेण्यास नकार

देशात असहिष्णुता वाढल्याचे आणखी एक उदाहरण ! जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे अल्पसंख्य हिंदूंची काय स्थिती होते, याचेही आणखी एक उदाहरण !
उत्तरप्रदेशातील भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे लज्जास्पद होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

प्रयाग : उत्तरप्रदेशातील कोशांबी येथे एका हिंदु तरुणीने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच या घटनेची तक्रार नोंद करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचेही समोर आले आहे. (अशा पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मुसलमानबहुल कोखराज गावामध्ये या हिंदु तरुणीचे एकमात्र घर आहे. त्यामुळे तिच्या आईवर मुसलमान घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकत आहेत. या तरुणीने सांगितले की, त्यांच्या शेजारी रहाणारा रईस नावाचा तरुण मला काही वर्षांपासून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्याला नकार दिल्याने त्याने माझ्यावर बलात्कार केला. पोलीस माझी तक्रार प्रविष्ट करून घेण्यास नकार देत आहेत. मला न्याय मिळाला नाही, तर मी जीव देईन; परंतु धर्म पालटणार नाही.

पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता म्हणाले की, पीडिता आणि शेजारच्या महिलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. तपास चालू आहे. पीडितेच्या तक्रारीवरून धर्मपरिवर्तनाची तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या पीडितेचा तक्रारअर्ज तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *