-
लव्ह जिहादचे लोण राजस्थानमध्येही !
-
तक्रार प्रविष्ट करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ !
-
पुढील सुनावणी होईपर्यंत पीडित मुलीला नारीनिकेतनमध्ये पाठवले !
कुठलेही सरकार सत्तेत आले, तरी मतांच्या लांगूलचालनासाठी ते लव्ह जिहाद कदापि रोखणार नाही, हेच आजपर्यंतच्या घटनांवरून सिद्ध होते. यास्तव हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जयपूर : एका धर्मांधाने हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर केल्याचा आरोप पीडित हिंदु मुलीच्या भावाने केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून दाद मागितली आहे.
या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, माझी २२ वर्षीय बहीण २५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. फैज महंमद नावाचा तरूण तिला त्रास देत होता. ती महाविद्यालयात गेल्याची संधी साधून महंमदने तिचे अपहरण केले. या प्रकरणी आम्ही पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यास गेलो असता पोलिसांनी ती प्रविष्ट करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर महमंदने माझ्या बहिणीला ब्लॅकमेल करून कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. तो तिला ब्लॅकमेल करत होता. त्याने सुपुर्द केलेले विवाहाचे प्रमाणपत्र बनावट आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत माझी बहीण घरीच होती. त्यामुळे तिने एप्रिल मासात धर्मांतर केल्याचा महंमदने केलेला दावा खोटा आहे. या घटनेमागे मोठे षड्यंत्र असून हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे, असा आरोप हिंदु मुलीच्या भावाने त्याच्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून न्यायालयात केला.
उच्च न्यायालयाने समन्स बजावल्याने पोलिसांनी पीडित हिंदु मुलीला न्यायालयात उपस्थित केले. ती बुरख्यामध्ये न्यायालयात उपस्थित होती. न्यायालयात तिने महंमदशी विवाह केल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने पोलिसांना तक्रार प्रविष्ट करून घेऊन सविस्तर अहवाल सादर करावा, असा आदेश दिला. पुढील सुनावणी होईपर्यंत पीडित हिंदु मुलीला नारीनिकेतन मध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरला होणार आहे.
अलीकडेच केरळमध्ये अखिला (पालटलेले नाव हदिया) या हिंदु मुलीचे धर्मांतर करून मुसलमान तरुणाने तिच्याशी विवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हिंदु मुलींना इसिस सारख्या आतंकवादी संघटनेमध्ये पाठवण्याचा हा प्रकार आहे, असा दावा त्यांनी न्यायालयात केला आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील या घटनेकडे लव्ह जिहादचे प्रकरण म्हणून पाहिले जात असून त्याविषयी सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Good