भोसरी (जिल्हा पुणे) : हिंदूसंघटन आणि धर्मजागृती या उद्देशाने येथे २६ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रसारासाठी येथील खेडेगावांमध्ये ग्रामस्थ अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी धर्मप्रसारामध्ये सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली असून सभा यशस्वी करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचाही मानस व्यक्त करत आहेत.
१. २ नोव्हेंबर या दिवशी कुरळी गावात ह.भ.प. किसन महाराज माळशीकर यांच्या हरिपाठानंतर कीर्तनकार आणि ग्रामस्थ यांची बैठक झाली. येथील विठ्ठल मंदिरामध्ये धर्माभिमानी युवकांचीही बैठक घेण्यात आली. दोन्ही बैठकांमध्ये गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे ठरवण्यात आले. चित्रफीतीच्या माध्यमातून हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी धर्मप्रेमींना अवगत करण्यात आले, तसेच हिंदूसंघटनांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
२. इंद्रायणीनगर येथे झालेल्या बैठकीत श्री. हनुमंत लांडगे यांनी पाणी आणि टेबल-आसंदी उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या रहात्या घरातील एक खोली सभा कार्यालय म्हणून उपलब्ध करून देण्याची सिद्धता दर्शवली. धर्मप्रसारासाठी प्रतिदिन एक घंटा वेळ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments