ठाणे : नुकताच मुंब्रा येथे इसिसचा भारतातील प्रमुख मुदब्बीर मुश्ताक शेख पकडला गेला. या आधी मुंब्रा येथे सिमी, हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पकडले होते. संसदेवर आक्रमण करण्याच्या गुन्ह्यांतर्गत अबू हमजा याला मुंब्रा येथूनच अटक झाली होती.
मुंब्रा येथील वाढती वीजचोरी, अनधिकृत बांधकामे, हिंदु महिला आणि अल्पवयीन मुली यांवरील अत्याचार पहाता आज हिंदूंमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूंमध्ये सुरक्षितता, जागृती आणि संघटन निर्माण करण्यासाठी मुंब्याजवळील डायघर भागात डायघर ग्रामस्थांच्या वतीने ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी पुढे आले आहेत. यामध्ये सभेसाठी निधी गोळा करणे, फ्लेक्स लावणे, भित्तीपत्रक लावणे, गावागावांत बैठका घेणे, रिक्षातून घोषणा करणे अशा प्रकारची जय्यत सिद्धता गावातील धर्माभिमानी हिंदूंनी केली आहे.
याचसमवेत मैदानावरील सिद्धतेसाठीही गावातील मुले स्वतः साहाय्यासाठी पुढे येत आहेत. या सभेला विश्व हिंदू परिषदेचे भिवंडी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. चिंतामणी महाराज, हिंदु चेतना मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल मोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके, हिंदू विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत उपस्थित रहाणार आहेत.
हिंदु धर्मजागृती सभेचा दिनांक : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१६
वेळ : दुपारी ४ वाजता
स्थळ : प.पू. स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण, डायघर गाव, कॅफेनगर, कल्याण फाटा, पो. पडले, ठाणे.
संपर्क : ९२२१०६७७७७, ९३२४८६८९०६
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात