Menu Close

जपानी लोकांमधील स्वयंशिस्त आणि संवेदनशीलता दर्शवणार्‍या काही कृती

• जपानच्या भौतिक प्रगतीमागे ते घेत असलेले कष्ट आणि पाळत असलेली स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी आहे.

• जपानी लोकांची प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात असलेली संवेदनशीलता, तसेच समाज आणि निसर्ग यांच्याविषयी असलेले भान हे भारतियांमध्ये येईल, तो सुदिन !

१. जपानमध्ये आगगाडी, उपाहारगृह आणि बंद सभागृहे यांमध्ये भ्रमणभाषचा वापर करण्यावर बंदी असते.

२. जपानमध्ये तुम्ही एखाद्या उपाहारगृहामध्ये गेल्यास जपानी लोक आवश्यक तेवढेच पदार्थ घेऊन ते पूर्णपणे खातांना आपल्या दृष्टीस पडतात. अन्न वाया न घालवण्याचा संस्कार त्यांच्यावर झालेला असतो.

३. जगातील श्रीमंत देशांमध्ये जरी जपानची गणना होत असली, तरी जपानी व्यक्तींच्या घरात नोकर नसतात. घरातील सर्व कामे आणि त्यांची मुले यांचे दायित्व पालकांनी घ्यायचे असते.

४. आरोग्याची काळजी कशी घ्यायची, याचे धडे मुलांना लहानपणापासूनच दिले जातात. शाळेत माध्यान्ह आहार घेतल्यानंतर मुले दात स्वच्छ करतात.

५. अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी जपानचे विद्यार्थी भोजन करण्यास अर्धा घंटा घेतात.

६. पहिली ते सहावी पर्यंतच्या प्राथमिक वर्गांमध्ये जपानी विद्यार्थ्यांनी इतर लोकांशी कसे वागावे, याविषयीची नीतीमूल्ये शिकवली जातात.

७. इयत्ता १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गांमध्ये परीक्षा नसतात; कारण या स्तरावर शिक्षणाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये संकल्पना रुजवणे आणि चारित्र्य घडवणे, हा असतो.

संदर्भ : संकेतस्थळ

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *