Menu Close

अभिनेता कमल हसन यांच्या विरोधात अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली !

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात तत्परतेने कृती करणारे अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन ! अन्य अधिवक्त्यांनीही यातून बोध घ्यावा !

वाराणसी – अभिनेता कमल हसन यांच्या वादग्रस्त लेखाच्या प्रकरणी उत्तरप्रदेशमधील शिवपूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीतील न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. त्रिपाठी यांनी कमल हसन यांच्या तमिळ साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या हिंदुविरोधी लेखावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये आतंकवाद बोकाळला आहे, असे लिखाण करणारे कमल हसन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही अधिवक्ता त्रिपाठी यांनी केली आहे. न्यायालयाने ही याचिका प्रविष्ट करून घेतली असून या प्रकरणी २२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *