योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे अन्य राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री कधी असे का म्हणत नाहीत ? केंद्र सरकारही गोमांस निर्यातीवर बंदी का घालत नाही ?
लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला कारागृहात डांबण्यात येईल. उत्तरप्रदेशातून सर्वाधिक गोमांस निर्यात केले जाते, हे खोटे आहे. राज्यातून कोणीही गोमांसाचा एक तुकडाही निर्यात करण्याचे धाडस करू शकत नाही, असे कणखर प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते विश्व हिंदु परिषदेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, राज्यातील गायरान भूमी चिन्हांकित करण्यासाठी भू माफीयाविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याचा उद्देश सरकारी भूमीवरील अवैध नियंत्रण दूर करणे हा आहे.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात